गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहादत सोहळ्यासाठी अमित शहा यांना निमंत्रण

0

नवी दिल्ली : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले. नवी दिल्ली येथे आज राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण दिले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी दि. २५ जानेवारी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण आदरपूर्वक स्विकारले आहे.

यावेळी पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष  रामसिंग महाराज, नांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, समन्वयक रामेश्वर नाईक, सह समन्वयक जसपाल सिंग, सदस्य  चरणदीप सिंग ( हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक  तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते.

नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २५ तारखेला दुपारी २ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तसेच, पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी देखील निमंत्रण स्वीकारले असून ते २४ तारखेला या सोहळ्याला उपस्थिती दर्शवतील, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech