महिंद्रा XUV 7XO एसयूव्हीचा वर्ल्ड प्रीमियर 5 जानेवारी 2026 ला

0

ठाणे : देशातील अग्रगण्य एसयूव्ही निर्माता महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपल्या आगामी प्रीमियम एसयूव्हीचे नाव ‘महिंद्रा XUV 7XO’ जाहीर केले आहे. ही एसयूव्ही येणाऱ्या 5 जानेवारी 2026 रोजी जागतिक स्तरावर (World Premiere) सादर केली जाणार आहे. गेल्या चार वर्षांत XUV700 ची 3 लाखांहून अधिक विक्री झाल्याने भारतीय एसयूव्ही बाजारात महिंद्राने भक्कम स्थान निर्माण केले आहे. XUV700 ला गेमचेंजर ठरवणाऱ्या डिझाइन, तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्सच्या परंपरेवर आधारीत नवीन XUV 7XO आणखी उंच स्तरावर नेली जात आहे.

नवीन XUV 7XO मध्ये प्रेरणादायी डिझाईन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सिद्ध असलेल्या अभियांत्रिकीची जोड असून, आराम, सुरक्षा आणि परफॉर्मन्सच्या सर्व परिमाणांमध्ये नवीन मानक प्रस्थापित करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे हा केवळ फेसलिफ्ट किंवा अपडेट नसून एक अस्सल नवा अनुभव देणारा मॉडेल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्रीमियम एसयूव्ही क्षेत्रात नेतृत्व टिकवण्यासाठी तयार करण्यात आलेली XUV 7XO ही उद्याच्या एसयूव्ही डिझाईन आणि इनोव्हेशनला नवे रूप देणारी ठरणार असल्याचे महिंद्राने म्हटले आहे.

🔹 नाव जाहीर करणारा अधिकृत व्हिडिओ:
YouTube — Mahindra XUV 7XO Official Reveal

🔹 सोशल मीडिया हँडल्स:

अधिकृत वेबसाईट: Mahindra XUV 7XO

ट्विटर: Mahindra XUV 7XO

फेसबुक: Mahindra XUV 7XO

यूट्यूब: Mahindra XUV 7XO

🔹 अधिकृत हॅशटॅग्स:
#XUV7XO #MahindraXUV7XO #Trendsetter #TheNewBenchmark #ComingSoon

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech