“अन्यथा घरी बसावे लागेल” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदारांना कडक इशारा

0

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा सभागृहात भाजपचे सदस्य प्रशोनत्तराच्या तासात वारंवार “लाडकी बहीण योजनेचा”वारंवार उल्लेख करतं असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर नाराजी व्यक्त करत स्वपक्षाच्या आमदारांसहित सर्वच आमदारांना कडक शब्दांत समज दिली की,”लाडक्या बहिणींना विरोध करू नका……अन्यथा घरी बसावे लागेल,”…..

मुख्यमंत्री फडणवीस यांनी असेही सुनावले की, लाडकी बहीण योजनेची तुलना इतर कोणत्याही योजना किंवा विषयांशी करणे चुकीचे आहे.ही योजना सुरूच राहणार असून तिला निधी देणे थांबविण्यात येणार नाही.राज्यातील अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे,त्यामुळे तिच्याविषयी संभ्रम निर्माण करणारे विधान अयोग्य असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्दा
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावर काँग्रेसच्या आमदार अँड.ज्योती गायकवाड यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर भाजपसहीत सर्वच पक्षातील महिला आमदारांनी विविध प्रश्न उपस्थित करत आपले मतप्रदर्शन मांडले.त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की,या प्रकरणी आरोपींविरोधात ठोस पुरावे मिळाले असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल.महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे.काहींनी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला. घडलेली घटना दुर्दैवीच असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी असेही स्पष्ट केले की,महिला सुरक्षितता महत्त्वाचीच आहे, परंतू त्याचा संबंध लाडक्या बहीण योजनेशी कोणीही करणे हे सर्वस्वी योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मग लाडकी बहीण योजनेमुळे निराधार योजनेतील निधी कमी झाल्याचा आरोप केला.त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, निराधार योजनेचे पैसे अडविलेले नाहीत.केवायसी पूर्ण न झाल्याने केवळ १० टक्के लाभार्थ्यांचे पैसे थांबले असून ती अडचण दूर केली जात आहे.

भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी अवैध दारूविक्रीच्या समस्येचा उल्लेख करताना “लाडक्या बहिणींचे दुःख” अशी टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण योजना आणू नका.योजनेला विरोध केला, तर त्याची राजकीय किंमत मोजावी लागू शकते.”असा सक्त इशारा आमदार पवार यांना दिला.

अवैध दारूविक्री थांबवण्यासाठी अध्यक्षांच्या निर्देशांनंतरही कारवाई झाली नसल्याची तक्रार याच आमदार पवार यांनी केली होती.या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की,अवैध दारु विक्री विरोधातील कारवाई होत असून आवश्यक ती पावले उचलली जातील.

त्याचवेळी अन्य काही सदस्यांनी महिलांच्या सुरक्षिततेकरिता बनविण्यात आलेल्या “शक्ती” कायद्यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले.त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने तीन नवे कायदे करताना शक्ती कायद्यातील काही तरतुदी समाविष्ट केल्या आहेत.केंद्र व राज्य यांच्या अधिकारांच्या मर्यादा लक्षात घेऊनच राज्याने त्या संदर्भातील कागदपत्रे परत पाठविले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech