विजयी उमेदवारांची यादी जाहीर करणाऱ्या पक्षांवर कारवाई करा

0

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत तब्बल २० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र निवडणुक कार्यालयाने उमदेवार विजयी जाहीर केले नसतांना अनेक जणांनी स्वतःच विजयी जाहीर करत राजकीय पक्षांनी त्याबाबत यादी जाहीर करत त्यांना प्रसिध्दी दिल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी करत त्यावर कारवाई करण्याची मागणी साळवी यांनी केडीएमसी आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होत आहे. त्यासाठी अनेक पक्षाच्या उमेदवारांनी आपले फॉर्म दाखल केले आहेत. काही पॅनलमधील प्रभागात आर्थिक दबावाला, सरकारी राजकीय दवावाला घाबरून आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. अनेक उमेदवारांना त्याच प्रकारची दबावतंत्र वापरण्यात आले. परंतु त्यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. ते सर्व निवडणूक लढवत आहेत. अनेकांनी दबावतंत्रामुळे आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे अनेक प्रभागात अनेक उमेदवारांना समोर प्रतिस्पर्धी राहीला नाही. पॅनल पध्दतीने निवडणुक असल्यामुळे पॅनलला मतदान होणार आहे. ज्या प्रभागात ज्या उमेदवारांना प्रतिस्पर्धा नसल्यामुळे त्यांनी आपण. विजयी झालो. हे जाहीर केले व तसा आनंद ही साजरा केला. त्या उमेदवारांच्या पक्षाने आपल्या लेटरहेड तसे जाहीरही केले.

निवडणूक कार्यालयातून हे विजयी झाले आहेत असे जाहीर झालेले नाही. त्यांना निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. निवडणुक कार्यालयाने त्यांना विजयी झाल्याचे पत्र किंवा प्रमाणपत्र दिलेले नसतांना त्यांनी स्वतः व त्यांच्या पक्षाने विजयी म्हणून जाहीर करणे हे निवडणुक आचार संहितेचा भंग केला आहे. त्यांनी असे जाहीर केल्यामुळे इतर प्रभागात लढणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या मतदारांना त्याचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे इतर प्रभागात चूकीच्या पध्दतीने निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे इतर प्रभागात याबाबतच्या प्रभावाखाली मतदान येईल. अशा प्रकारे मतदान होणे निवडणुक आचारसंहितेच्या विचार करता अन्यायकारक आहे व आचारसंहितेचा भंग करणारे आहे.

त्यासाठी ज्या पक्षाने व उमेदवारांनी अशाप्रकारे आपला विजय जाहीर केला आहे. काही विशिष्ट पक्ष जर संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारामध्ये बाधा निर्माण करीत असतील तर तो संविधानाचा व निवडणुक आयोगाच्या स्वायत्ततेचा भंग असल्याचा आरोप साळवी यांनी केला असून या उमेदवारांची उमेदवारी त्वरित रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech