तनिष्कने आपल्या नवीन ‘ह्यूज’ (Hues) कलेक्शनमधून आधुनिक भारतीय स्त्रीसाठी नैसर्गिक रत्नजडित दागिन्यांची एक नवी ओळख निर्माण केली

0

नागपूर :  भारतातील आघाडीचा ज्वेलरी ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य असलेल्या ‘तनिष्क’ने, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रस्तुत केली आहे नैसर्गिक रंगीत जेमस्टोन्सची जादू – नवे खास कलेक्शन ‘ह्यूज’ (Hues)! भारतीय ग्राहकांची रंगीत जेमस्टोन्सची वाढती आवड लक्षात घेऊन सादर केलेले हे १००% नैसर्गिक जेमस्टोन्सचे कलेक्शन, शुद्धता आणि उत्कृष्ट डिझाइनप्रती तनिष्कची वचनबद्धता दर्शवते. आजच्या आधुनिक स्त्रियांना आपली एक वेगळी आणि खास ओळख निर्माण करायची आहे, आणि तनिष्कची ही नवी शैली त्यांची हीच आवडनिवड लक्षात घेऊन साकारली आहे. मग तो ऑफिसचा डेली लूक असो किंवा एखाद्या विशेष सोहळ्याची शान, हे जेमस्टोन्स तुमचा प्रत्येक क्षण खास बनवतील.

हे कलेक्शन भारतात उन्हाळ्यात दिसणारे विविध, उठावदार रंग आणि वातावरणातील मोकळेपणाने प्रेरित आहे. याच रंगांचा विलोभनीय अनुभव आधुनिक व कलात्मक डिझाईन्समध्ये गुंफण्यात आला आहे. यातील प्रत्येक दागिन्याच्या केंद्रस्थानी एक जेमस्टोन आहे. जेमस्टोन्सची नैसर्गिक चमक आणि त्यातील सखोलता अधिक खुलवण्यासाठी, त्यांच्या सभोवतालची रचना आणि आकार अत्यंत बारकाव्याने तयार करण्यात आले आहेत. या कलेक्शनमध्ये तुम्हाला जेमस्टोन्सच्या विविध ‘कट्स’ अर्थात पैलूंची जादू पाहायला मिळेल — मग तो क्लासिक ‘मार्कीझ’ (marquise) असो, कोरीव कामाचा ‘ताबीझ’ (tabiz) कट असो किंवा रेशमी स्पर्श देणारे ‘कॅबोचॉन’ (cabochon) स्टोन्स. प्रत्येक पैलू या जेमस्टोन्सची एक वेगळी चमक आणि त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व अधोरेखित करतो. रंगांचे लेयरिंग आणि ‘बंचिंग’ व ‘स्लाइसिंग’ सारख्या तंत्रांच्या वापरामुळे या दागिन्यांमध्ये सखोलता आणि जिवंतपणा जाणवतो. याची परिणीती म्हणून असे कलेक्शन साकार झाले आहे, जे केवळ आधुनिक, स्टायलिश आणि प्रभावीच नाही, तर ते परिधान करणारीच्या व्यक्तिमत्वाला एक नवी ओळखही देतात.

अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर, तनिष्कचे ‘ह्यूज’ कलेक्शन सोन्याकडे पाहण्याचा ग्राहकांचा दृष्टिकोन बदलत आहे. आता सोने केवळ गुंतवणुकीसाठी नाही, तर स्वतःची आवड आणि स्टाईल व्यक्त करण्याचे एक सुंदर आणि प्रभावी माध्यम बनले आहे. या कलेक्शनमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून उत्कृष्ट नैसर्गिक जेमस्टोन्स निवडले गेले आहेत—जसे की पाचू (Emerald), ॲमेथिस्ट (Amethyst), सिट्रीन (Citrine), टूमलाईन (Tourmaline) आणि टांझॅनाइट (Tanzanite). प्रत्येक जेमस्टोन १००% नैसर्गिक असून, त्यांची चमक, शुद्धता आणि खास रंगासाठी कडक निकषांवर तपासणी केली गेली आहे. तनिष्कच्या दागिन्यांमध्ये तुम्हाला सौंदर्याबरोबरीनेच मिळतो पूर्ण विश्वास — पारदर्शक किंमत, लाइफटाइम मेंटेनन्स आणि १००% एक्स्चेंज व्हॅल्यूसह. हे कलेक्शन केवळ सुंदरच नाही, तर भारतातील अस्सल जेमस्टोन्सच्या दागिन्यांप्रती एक नवा विश्वास निर्माण करते.

या कॅम्पेनचा केंद्रबिंदू आहे तृप्ती डिमरी, जिने ‘ह्यूज्’ची शैली पडद्यावर अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. हे कॅम्पेन आपल्याला सांगते की, रंग म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम! दागिने एखाद्या महिलेचा मूड, तिची ओळख आणि तिच्या बदलत्या शैलीचा अविभाज्य भाग असे बनतात, हे यात दर्शवण्यात आले आहे. कॅम्पेनचा मुख्य चेहरा म्हणून तृप्ती डिमरी ‘ह्यूज’ची खरी ओळख बनली आहे — अत्यंत शालीन आणि आधुनिक, जिथे तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि चिरतरुण सौंदर्य उठून दिसते. देखण्या फोटोंच्या माध्यमातून आपण यात रंग, डिझाइन आणि भावनांचा एक अनोखा संगम अनुभवतो. ‘ह्यूज्’ हे आजच्या बदलत्या भारतीय स्त्रीचे रूप आहे— जी आपल्या मुळांशी जोडलेली आहे, आत्मविश्वासाने चकाकत आहे आणि आपले विचार ठामपणे मांडू शकते.

या लाँचच्या निमित्ताने, टायटन कंपनी लिमिटेडच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर, पेल्की त्शेरिंग म्हणाल्या: “आधुनिक भारतीय महिलांसाठी नैसर्गिक जेमस्टोन्सच्या अनुभवाला एक नवे रूप देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या काळात दागिने फक्त सजावटीपुरते राहिले नसून, स्वतःला व्यक्त करण्याचे ते एक सशक्त माध्यम बनले आहेत. अशा वेळी, आपल्या चकाकीने आणि आगळ्यावेगळ्या शैलीने हे जेमस्टोन्स महिलांना त्यांच्या आवडीची क्षितिजे रुंदावण्यासाठी प्रेरित करतात. पारंपरिक आणि आधुनिक विचारांच्या मिलापातून साकारलेले आमचे हे पहिले कलेक्शन, भारतातील उन्हाळ्यातील टवटवीत रंग आणि त्यातील मुक्त भावना स्वतःमध्ये सामावून घेते. हे कलेक्शन रंगांना एका धाडसी आणि भव्य रूपात सादर करते—अगदी तशाच प्रकारे जसे आजची स्त्री दागिने परिधान करणे पसंत करते, अगदी सहजतेने आणि स्वतःला आवडतात तसे. तृप्ति आपल्या आधुनिकतेने आणि मुळांशी घट्ट असलेल्या नात्याने हा विचार प्रत्यक्षात उतरवते, जी हुबेहूब आमच्या त्या ग्राहकांसारखीच आहे ज्यांच्यासाठी आम्ही दागिने बनवतो.”
तनिष्कच्या हेड ऑफ डिझाइन, गरिमा माहेश्वरी म्हणाल्या: “’ह्यूज्’च्या माध्यमातून आम्ही अलीकडच्या काही वर्षांतील भारतातील नैसर्गिक जेमस्टोन्सवरील एक सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी डिझाइन प्रयोग साकारला आहे. ही श्रेणी भारतातील उन्हाळ्याच्या सौंदर्याने — विविधरंगी निसर्गाने आणि मोहक रंगांनी प्रेरित आहे, ज्याला आम्ही कलात्मक आकार आणि आधुनिक डिझाइनचे रूप दिले आहे. या कलेक्शनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात जेमस्टोन्स केवळ सजावटीचा भाग नसून, संपूर्ण डिझाइनची तीच खरी सुरुवात आहेत. यासाठी आम्ही जेमस्टोन्सचे कटिंग आणि त्यांच्यातील ताळमेळावर अतिशय बारकाईने काम केले आहे, जेणेकरून प्रत्येक दागिन्यामध्ये रंग, प्रमाण आणि समतोल अचूक साधला जाईल. परिणामी, एक असे कलेक्शन तयार झाले आहे जे केवळ आधुनिक आणि प्रभावीच नाही, तर भारतीय डिझाइनकडे पाहण्याचा एक नवा आणि सशक्त दृष्टिकोनही मांडते.”

तनिष्कसोबतच्या सहयोगाबद्दल आनंद व्यक्त करताना तृप्ती डिमरी यांनी सांगितले: “तनिष्कचे हे कलेक्शन आणि या कॅम्पेनची मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, विविध रंगांच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्व मांडण्याची सहज शैली. ही फिल्म त्या साध्या आणि नैसर्गिक भावनेला अधोरेखित करते, जिथे तुम्ही तुमच्या मूडनुसार निवड करता आणि ती एक निवड तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला बदलवते. तनिष्कच्या ‘ह्यूज्’बद्दल सांगायचे तर, हे एखाद्या खास प्रसंगापेक्षा तुम्ही त्या क्षणी स्वतःला कसे अनुभवता याबद्दल जास्त आहे — एक अशी पद्धत जी अत्यंत सोपी आहे आणि पूर्णपणे तुमची स्वतःची आहे.”

या कलेक्शनच्या किमती ₹३०,०००* पासून सुरू होतात. हे दागिने प्रत्येक प्रसंगासाठी आणि रोजच्या वापरासाठी अगदी योग्य आहेत. अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर, तनिष्क तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास ‘फेस्टिव्ह ऑफर्स’ — सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (मेकिंग चार्जेस) आणि डायमंड व्हॅल्यूवर २०% पर्यंत सूट*. सोबतच, सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मिळवा प्रति ग्रॅम ₹२०१ ची सरसकट सूट*. इतकेच नाही, तर तुम्ही तनिष्कच्या ‘फेस्टिव्हल ऑफ एक्सचेंज’चा लाभही घेऊ शकता. तुमचे जुने सोने बदलून नवीन, स्टायलिश आणि कायम लक्षात राहतील असे तनिष्कचे दागिने घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech