अहिल्यानगर : नगर शहरातील दिव्यांग जलतरणपटू अभिजीत माने हा विखे पाटील फाउंडेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून रविवारी १६ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या अरबी समुद्रात होणाऱ्या सागरी जल तरण स्पर्धेत सहभागी होणार आहे.या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र स्टेट ॲम्युचर ॲक्वोटिक्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.या स्पर्धेत दिव्यांग गटातून सहभागी होणारा अभिजीत हा जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.
अभिजीत माने याने जिल्हा व राज्यस्तरावर जलतरण स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकाविली आहे.तो पहिल्यांदाच सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होत आहे.यासाठी त्याला विखे पाटील फाउंडेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आलेले आहे.त्याच्या सरावासह स्पर्धेचा खर्च देखील फऊंडेशनच्या वतीने उचलण्यात आलेला आहे.दिव्यांग गटातून १ कि.मी. चा टप्पा गाठायचा आहे.या स्पर्धेला रविवारी गेट ऑफ इंडिया येथून प्रारंभ होणार आहे.या स्पर्धेसाठी अभिजीतकडून मुळाडॅम आणि विळद घाट येथील विखे पाटील कॉलेजच्या जलतरण तलावात अकॅडमीच्या तज्ञ प्रशिक्षकांकडून सराव घेण्यात आलेला आहे.
अभिजीतच्या आईच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जलतरणाचे धडे देण्यात आलेले आहे.मात्र पुढील वाटचालीसाठी विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून धनश्री विखे यांनी त्याची जबाबदारी घेतली आहे. फक्त अभिजीत नव्हे तर इतर दिव्यांग खेळाडूंना अतिशय आस्थेने व आपुलकीने प्रोत्साहन देण्याचे काम त्या करत आहे.दिव्यांगांची आई म्हणून धनश्री दिव्यांगाना आधार देत आहेत.दिव्यांगांचा सर्व खर्च ते उचलत आहे.आपुलकीच्या भावनेने त्यांचे योगदान सर्व पालकांना भावनिक करत आहे असे दिव्यांग खेळाडू अभिजीत माने यांचे वडिल जगन्नाथ माने यांनी सांगितले.