केजरीवालांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0

सार्वजनिक निधीच्या गैरवापराचे प्रकरण

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची सत्ता गमावल्यानंतर आता केजरीवालांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. सार्वजनिक निधीच्या गैरवापरप्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर गुन्‍हा दाखल करण्‍याचे आदेश दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. सार्वजनिक निधीच्या गैरवापरप्रकरणी अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी शिवकुमार सक्सेना यांची याचिका दाखल केली होती. न्‍यायालयोन ती स्वीकारली. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आगामी १८ मार्च रोजी या प्रकरणी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech