सिंधुदुर्ग : ‘होय आपला देश टी.बी.मुक्त होवू शकतो’, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी म्हटले आहे. रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. जाधव बोलत होते. २४ मार्च हा दिन जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. डब्ल्यूएचओची यावर्षीची थीम “होय आपण टीबी मुक्त होऊ शकतो “अशी आहे समाजामध्ये टीबी या आजाराविषयी जनजागृती व्हावी या आजाराची लक्षणे उपचार निदान सर्व लोकांना समजावून सांगण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
या कार्यक्रमांमध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हर्षल जाधव रोटरी क्लब अध्यक्ष व इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे टीबी विभागाचे सुरेश मोरजकर, लक्ष्मण कदम तसेच महिला बाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ भावना तेलंग, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ कविता पराडकर, डॉ सुशांता कुलकर्णी, रोटरीचे सेक्रेटरी राजीव पवार, राकेश म्हडदळकर आणि आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ नागरिक आणि रुग्ण उपस्थित होते. टीबी निक्षय मित्र या कार्यक्रमांतर्गत उपचार घेणाऱ्या टीबी रुग्णांना फूड बास्केटचे वितरण रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांचे मार्फत करण्यात आले. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली डिपार्टमेंट भारत सरकार, यांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.