नाशिक : विभागलेली कुटुंब जर एकत्र आले तर मला आनंदच होईल मग तो ठाकरे परिवारासोबत किंवा पवार परिवार असो. राजकीय मतभेद बाजूला असू शकतात पण कुटुंबासाठी कोणताही दुरावा नको, अशी स्पष्ट भूमिका माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी नाशिक दौऱ्यावरती असताना माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ हे पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांची अलीकडच्या काळामध्ये भेटी वाढले आहेत. त्यावर भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की साखर प्रश्नावरती सातत्याने दोघांच्या बैठका होत आहेत जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे एकत्र बसून प्रश्न सोडविणे याकडेही दोघांची भूमिका असल्याचे स्पष्ट करून सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पवार परिवार हा आग्रही राहिलेला आहे, असे सांगून संजय राऊतानी व्यक्त केलेल्या भूमिकेबाबत बोलताना भुजबळ पुढे म्हणाले की, जर राऊत मानत असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे विभागलेले कुटुंब एकत्र आले तर मला आनंदच होईल कारण यातून एक नवा संदेशही मिळणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी टीका करताना म्हटले होते त्यावर बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, मी बाळासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेलं शिवसैनिक आहे. मला समाजकारणाबरोबर राजकारणाचे देखील धडे देण्यात आलेले आहेत. मी लढता लढता समाजसेवा ही करीत असतो जोपर्यंत अंगात शक्ती आहे तोपर्यंत मी लढतच राहील याबाबत एकदा संजय शिरसाठ यांनी आपली भूमिका आणि इतिहास तपासून बघावा असा त्यांनी सल्ला देखील यावेळी दिला. दाभोळकर यांच्या पुस्तक प्रकाशनाबाबत बोलताना ते म्हणाले की, दाभोळकर यांचे आरोपी सापडत नव्हते आता ते सापडले आहेत. काही सापडलेले नाहीत पण काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे, असे मत व्यक्त करत अलीकडच्या काळामध्ये काही समाजसेविकांनी अमिषा यांच्या हेलिपॅड बाबत जी भूमिका घेतली होती.
त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की हे सर्व काम प्रशासनाचे असते आणि प्रशासन ते करत असते. सिंहस्थ कुंभमेळा बाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, या सर्व कामांबाबत मुख्यमंत्री आणि इतर अधिकारी यांनी लक्ष घातलेले आहेत. कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी सुविधा तयार केल्या जात आहेत त्याचे अभ्यासपूर्वक नियोजनही केलं जात आहे. त्यामुळे यावर काम पूर्ण होईपर्यंत तरी भाष्य करण्यात काही उपयोग नाही. मराठी व हिंदी भाषा बाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मराठी ही आपली मातृभाषा आहे तिचा अवमान करायचा नाही अशी सगळ्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले की, हिंदी भाषेची शक्ती कुणालाही केली नाही पाहिजे कारण ज्याला शिकायचं असेल तो शिकेल तसंच संस्कृत भाषेच्या भूमिका बाबतही ते म्हणाले की सक्ती नकोच. तर पाणीटंचाई बाबत बोलताना ते म्हणाले की प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कारण उष्णता वाढत आहे पिण्याच्या पाण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे पाणीसाठा असलेल्या विहिरी या ताब्यात घेतल्या पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.