श्रीनगरमध्ये अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणणार
राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय मदतकार्याला येणार वेग
मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. आज खाजगी विमानाने ते जम्मू काश्मीरला रवाना झाले. पेहेलगाम येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यानंतर तिथे अडकून पडलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेची मदत पथक काल श्रीनगरला रवाना झाले होते. त्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे जम्मू आणि काश्मीरला गेल्यामुळे सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मदत कार्याला अधिक वेग येणार आहे. तसेच कोणतीही दुर्घटना घडल्यास एकनाथ शिंदे सर्वात आधी मदतीला धावून जातात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.