गौतम गंभीरला इसिसकडून जीवे मारण्याची धमकी

0

नवी दिल्ली : भारताच्या क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला इसिस या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.गौतम गंभीरला मंगळवारी(दि.२२) दुपारी आणि संध्याकाळी “IKILLU” असा संदेश असलेले दोन ईमेल मिळाले आहेत.यासंदर्भात गौतम गंभीरने तात्काळ २३ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला आहे.या हल्ल्याबद्दल गौतम गंभीरने स्वतः सोशल मीडियावर दुःख आणि संताप व्यक्त केला आहे आणि जबाबदार असलेल्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. यानंतर गौतम गंभीरला ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, धमकीनंतर गौतम गंभीरने तात्काळ २३ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांकडे संपर्क साधला आणि औपचारिकपणे एफआयआर नोंदवण्याची विनंती सादर करत एफआयआर दाखल केला. यासोबतच गंभीरने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तात्काळ सुरक्षेची मागणी केली. त्याने राजिंदर नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ आणि मध्य दिल्लीचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांच्याशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

गंभीरला जीवे मारण्याची धमकीची पहिली वेळ नाही. या आधी नोव्हेंबर २०२१ मध्ये गंभीरला खासदार असताना अशीच धमकी मिळाली. पण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आलेल्या या अलिकडच्या धमकीने खळबळ माजली आहे. दिल्ली पोलिसांनी आश्वासन दिले आहे की ते त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech