पाकिस्तान सरकारचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक

0

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी(दि.२३) सायंकाळी झालेला बैठकीत भारताने पाकिस्तानच्या विरोधात 5 मोठे निर्णय घेतले आहेत. यासोबतच भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंट वर बंदी घातली आहे.भारतात पाकिस्तानचे अधिकृत एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर एक्सने हे पाऊल उचलले आहे. या विनंतीनुसार, पाकिस्तान सरकारचे अकाउंट निलंबित करण्यात असून, आता ते भारतातील युजर्ससाठी उपलब्ध नाही. दहशतवाद्यांना सतत पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने कठोर धोरण स्वीकारले आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर विविध निर्बंध लादले होते. त्यानंतर आता पाकिस्तान सरकारचे एक्स अकाउंटही भारतात ब्लॉक करण्याचाही निर्णय घेतला आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालया बाहेरील पोलीस सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे .पहलगाम हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था पाकिस्तान आणि उच्चायुक्तालयाबाहेर वाढवली होती .मात्र दिल्ली पोलिसांनी आता सर्व बारिकेट हटवले असून त्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे.अनेक लोक पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनेही करत आहेत.पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले सर्व राजनैतिक संबंध संपवणे भारतातील पाकिस्तानच्या फेसबुक आणि युट्युब चॅनलवर बंदी घालणे. असे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. जेणेकरून पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्यास भाग पाडता येईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech