मुंबई : मुंबई हायकोर्टाने पोलिसांना स्टॅन्डअप कॉमेडीयन कुणाल कामराला अटक न करण्याचे आदेश दिले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त गाण्यामुळे कुणाल कामरा विरोधात तपास सुरु आहे.पण कुणालला अटक करून नये असे निर्देश आता कोर्टाने दिले आहेत. कुणाल कामराने ‘स्टँड-अप कॉमेडी शो’ दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर कथित विडंबन गीत केल्याने खार पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी विनंती केली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने कामराची ही याचिका स्वीकारली आहे.
अंतिम दिलासा देताना खंडपीठाने महटलं की, याचिका प्रलंबित असताना ‘कॉमेडियन’ ला अटक करू नये. कोर्टाने म्हटलंय, ”तपास सुरु राहू शकतो. याचिकाकर्ता कुणाल कामराला याचिका प्रलंबित असताना अटक केलं जाऊ शकत नाही.” ‘जर कामरा आपला जबाब नोंद करू इच्छित असेल तर त्याला आधी सूचना देऊन नंतर चेन्नईमध्ये त्याचा जबाब नोंद करून घ्यायला हवा.’ कामराने आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, तो तामिळनाडूचा निवासी आहे आणि कार्यक्रमानंतर त्याला ज्या जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, त्या कारणास्तव तो महाराष्ट्रात यायला घाबरत आहे.
कामराने पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर सुनावणी पूर्ण होऊपर्यंत खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे. तथाकथित प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत कामराला अटक करू नये, असे खंडपीठाने आधीही स्पष्ट केले आहे. कुणाल विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अटकेच्या भीतीने कुणालने गुन्हा रद्द करण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. कामराने कोर्टाला सांगितले की, त्या प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या समक्ष व्हिडिओ-कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून हजर राहण्यासाठी तो तयार आहे.