रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे रविवारी (दि. २७ एप्रिल) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पवार रविवारी सकाळी पावणेदहा वाजता सावर्डे (ता. चिपळूण) येथे सह्याद्री शिक्षण संस्था ग्राऊंडच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने येतील. त्यानंतर सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या कोकण महाराष्ट्र – महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा प्रारंभ करतील. त्यानंतर ते साडेदहा वाजता कसबा (ता. संगमेश्वर) येथे पोहोचतील. तेथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नियोजित स्मारकाच्या जागेची, प्राचीन कर्णेश्वर पुरातन मंदिराची पाहणी करतील. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गासोबत आढावा घेतील. त्यानंतर दुपारी १ वाजता सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निककडे रवाना होतील. तेथे दुपारी २ वाजता सह्याद्री स्कूल ऑफ आर्टला सदिच्छा भेट देतील आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होतील.
महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे आज रात्री पोलादपूर खेड मार्गे चिपळूणला येऊन मुक्काम करतील. रविवारी सकाळी ९ वाजता कसबा (ता. संगमेश्वर) येथे सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या कोकण विभागाच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा प्रारंभ करतील. त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारी १ वाजता त्या माणगावकडे (जि.रायगड) रवाना होतील.