झेलम एक्स्प्रेसने निघालेले सुमारे ३०० पर्यटक पुण्यात दाखल

0

पुणे : गुलमर्ग, सोनमर्ग पाहून झाले होते. मंगळवारी पहलगामच्या बैसरन घाटीत जाण्याचे ठरले. श्रीनगरहून पहलगामच्या दिशेने निघालो. वाटेत भूक लागली म्हणून एका हॉटेलच्या ठिकाणी थांबलो. आमचा तीस जणांचा ग्रुप होता. जेवण्यास उशीर झाला. पहलगामला पोहोचलो, मात्र तिथली परिस्थिती वेगळी होती. सैनिकांची वाढलेली वर्दळ, आकाशात हेलिकॉप्टरच्या घिरट्या, भेदरलेले नागरिक… हे सारे पाहून काहीतरी अघटित घडल्याची कुणकुण लागली. तेवढ्यात कोणीतरी सांगितले की, वरच्या भागात दहशतवादी हल्ला झाला… आम्ही जागीच स्तब्ध झालो. आम्ही जर आधी पोहोचलो असतो तर कदाचित आम्हीदेखील मारले गेले असतो, मात्र दैव बलवत्तर म्हणून आम्ही बचावलो… या भावना होत्या हडपसर येथे राहणाऱ्या अश्विनी शेवते यांच्या. झेलम एक्स्प्रेसने शुक्रवारी त्या कुटुंबीयांसमवेत पुण्यात दाखल झाल्या.बुधवारी रात्री जम्मू तावी येथून झेलम एक्स्प्रेसने निघालेले सुमारे ३०० पर्यटक शुक्रवारी दुपारी पुण्यात दाखल झाले.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech