दृष्टी आनंद से जीनेकी : डॉ. दिलीप पटवर्धन यांनी साकारली जीवनविद्या मिशनवर वेबसिरीज

0

मुंबई : सद्गुरु वामनराव पै यांचे तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहोचले पाहिजे हा संकल्प मनात धरून बीबीएस सेवा या चॅनेल ने एक वेब सिरीज तयार केली आहे. त्या वेब सिरीज चे नाव आहे, ‘दृष्टी आनंद से जीनेकी’. जीवनविद्या मिशनचा उद्देश हा आहे की भारताने जगाचे नेतृत्व करावे आणि जगात शांती स्थापन करावी. त्यासाठी तरुण वर्गाला एक प्रेरणा मिळावी म्हणून. सुप्रसिद्ध नेत्र शल्य विशारद डॉक्टर दिलीप पटवर्धन यांचे जीवनावर वेब सिरीज तयार केली आहे अतिशय सामान्य कनिष्ठ मध्यम वर्गात जन्म घेऊन गेली ४५ वर्षे सचोटीने व्यवसाय करून अतिशय आनंदाचे आणि समाधानाचे आयुष्य ते जगत आहेत. जीवनविद्येचे तत्वज्ञान डॉ. दिलीप पटवर्धन प्रत्यक्ष आचरणात आणत आहेत.

ही वेबसिरीज पाहिल्यावर प्रामाणिक पणे कौशल्य वापरून नीतिमत्ता जागृत ठेऊन देखील ऐश्वर्य मिळविता येते, याबद्दल तरुणांच्या मनात खात्री निर्माण होईल याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी कधीही जात पात मानली नाही, बुवाबाजीला उघडे पाडले. अंधश्रद्धेच्या विरुद्ध प्रत्यक्ष कृती करून समाजास दाखवून दिले की श्रद्धा डोळस असली पाहिजे सावध तोच सुखी’ हा सद्गुरूंचा अमृत तुषार अंमलात आणला. सध्या ते अनेक विद्यालयांत, महाविद्यालयानत, पोलिसांना, बंदिवानांना, डॉक्टरांना, नर्सेसना जीवन मूल्ये या विषयावर व्याख्याने देऊन समाजात जागृती निर्माण करीत आहेत. ही सिरीज डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या वैयक्तिक प्रसिद्धी साठी केलेली नसून सर्वांना या जीवनविद्येच्या ज्ञानाने जीवनात आनंद व सुख खऱ्या अर्थाने उपभोगता यावे यासाठी हे नियोजन आहे. १ मे २०२५ पासून युट्युबवर बीबीएस सेवा या चॅनेल वर सुरु होत आहे . ही सिरीज हिंदी भाषेत केली आहे. कारण भारतातील सर्वांना लाभ मिळावा ही इच्छा याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन जीवनविद्या मिशन तर्फे करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech