कल्याण ट्रॉफी डिस्ट्रिक्ट गेम्स
कल्याण :– ‘कल्याण ट्रॉफी डिस्ट्रिक्ट गेम्स’ अंतर्गत उल्हासनगर येथील श्री चैतन्य टेक्नो स्कूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बदलापूरच्या पोद्दार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल आणि डोंबिवलीच्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल ने बाजी मारली. स्पर्धेत मुंबई विभागामधून 335 खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. या खेळांचे आयोजन स्पोर्ट्स केयर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी कल्याण पश्चिम चे मा.आमदार नरेंद्र पवार हे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
*8 वर्षाखालील मुले*
1.होली एंजल् स्कूल, डोंबिवली
2.नर्व फुटबॉल क्लब उल्हासनगर
*10 वर्षाखालील मुल*
1.पोद्दार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल, बदलापूर
2.एस.एस.ए.सी फुटबॉल क्लब कल्याण.
3) श्री चैतन्य टेक्नो स्कूल, डोंबिवली
*12 वर्षाखालील मुल*
1)पोद्दार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल बदलापूर
2)श्री चैतन्य टेक्नो स्कूल, डोंबिवली
3)के.एस.एस, फुटबॉल क्लब कल्याण
*14 वर्षाखालील मुल*
1) पोद्दार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल स्कूल
2) के एस एस, फुटबॉल क्लब कल्याण
3)श्री चैतन्य टेक्नो स्कूल उल्हासनगर
*17 वर्षाखालील मुल*
1) विकिंग्स फुटबॉल क्लब
2) पोद्दार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल
3) सॉकर स्टार फुटबॉल क्लब