नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठी भाषेतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यांसदर्भात मोदींनी ट्विटरवर खास मराठीतून संदेश जारी केला आहे. आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम नरेंद्र मोदी गुरुवारी, महाराष्ट्र दिनी मुंबई दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन करतील.भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याचवेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.’ असे मोदी यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.