जम्मू काश्मीर: लष्कराचा ट्रक दरीत कोसळून ३ जवान हुतात्मा

0

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्कराचा ट्रक २०० ते ३०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या घटनेत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी(दि.४) रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरून २०० ते ३०० मीटर दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला.या घटनेत अमित कुमार, सुजित कुमार आणि मान बहादूर या तीन तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला. जम्मूहून श्रीनगरला लष्काराचा ताफा जात असताना हा अपघात घडला आहे. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य करण्यात आले.जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांशी संबंधित ही सहा महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी, ४ जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील एसके पायीन भागात सहा जवानांना घेऊन जाणारा लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता आणि दोन गंभीर जखमी झाले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech