“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या कल्याणमध्ये

0

नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे

ठाणे : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन कल्याण येथील मॅक्सी मैदान, रामबाग लेन, नूतन हायस्कूल समोर, कर्णिक रोड येथे दि.7 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांनी केले आहे.

या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण दलाचे उप नियंत्रक विजय जाधव व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech