भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय

0

अमृतसर : पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य करीत सोडलेले मिसाईल्स आणि ड्रोन्स भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने नष्ट केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्क्रीय ठरला आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या जिहादी दहशतवाद्यांनी २६ हिंदू पर्यटकांचे टार्गेट किलिंग केले होते. या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ६ आणि ७ मे च्या रात्री पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळं उध्वस्त केलीत. यानंतर पाकिस्तानने ७ आणि ८ मे च्या रात्री भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानचा हल्ला पुर्णपणे निष्क्रीय झाला असून पाकिस्तानी मिसाईलचे अवशेष पडलेले आढळून आले आहेत. पंजाबच्या अमृतसर परिसरात अनेक ठिकाणी पाकिस्तानी मिसाईलचे अवशेष आढळून आलेत. स्थानिक ग्रामस्थांना आज, गुरुवारी सकाळी हे अवशेष आढळून आल्यानंतर याबाबत पोलिसांना आणि सैन्याला कळवण्यात आले. त्यानंतर पोलिस आणि सैन्य अधिकाऱ्यांनी हे तुकडे आपल्या ताब्यात घेतले आहेत. एकीकडे पाकिस्तानची स्वतःची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त झाली असतानाच भारतीय एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसून आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech