भारत – पाक तणावामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ

0

जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून नापाक कारवाया केल्या जात असून भारताकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, यातच भारत पाक युद्धाच्या परिणामामुळे खाद्यतेलाच्या दरात प्रतीकिलो साडेतीन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. पुन्हा वाढीचे संकेत होते. मात्र, झालेली दरवाढ स्थिर राहिली.

शेंगदाणा तेल मात्र १४८ ते १५० रुपये किलोवर स्थिर आहे. सूर्यफुल व सोयाबीन या तेलाचे दर प्रतीकिलो साडेतीन ते पाच रुपयांनी वाढले. सूर्यफुल तेल १४९ रुपये किलो होते. ते सध्या १५३ रुपयांवर गेले. तर, सोयाबीन तेल १२९ वरून १३३ रुपयांवर पोहोचले. विविध कंपन्यांच्या पॅकेजिंग तेलात सरासरी साडेतीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर स्थीर आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech