सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त

0

जळगाव : सोने दरात चढ उत्तर सुरु आहे. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचा दर जीएसटीसह एक लाखाच्या वर गेला होता. मात्र, आता मागच्या दोन दिवसात घसरण झाल्याने सोन्याचा तोळा पुन्हा लाखाच्या खाली आला आहे. जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली आहे. बाजाराच्या शेवटच्या दिवशी सोने दरात ५०० रुपयांची घसरण होऊन सोन्याचे प्रती तोळा दर ९६८०० (जीएसटीसह ९९७०२) वर खाली आले. दुसरीकडे चांदी दरात १००० रुपयाची वाढ झाली.

चांदीचा एक किलोचा दर आता ९८००० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. चालु आठवड्याच्या पहिल्या दिवशी ९५८०० रुपये असलेले सोने मंगळवारी १४०० रुपयांनी वाढून जीएसटीसह १००११६ वर पोहचले होते. ते बुधवार देखील एक लाखाच्या वर होते. पण गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस सोने दरात घसरण झाली. मागच्या दोन दिवसात सोने दरात ९०० रुपयाची घसरण झाली आहे. २१ व २२ एप्रिल या दोन दिवशी सोने अनुक्रमे १००४२५ व १०९९७० (विनाजीएसटी ९९०००) रुपये तोळा इतके होते. गेल्या वेळी सोन्याचे दर एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर खाली आले तेव्हा अगोदरच्या दरापेक्षा १३०० रुपये वाढले होते. तर मे महिन्यातील दरवाढीनंतर झालेल्या घसरणीत सोने ३९०० रुपयांनी महागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech