ऑपरेशन सिंदूर भारताच्या राजकीय, सामाजिक, धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक – राजनाथ सिंह

0

– ब्रह्मोस एकात्मिकीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचे उद्घाटन

लखनौ : ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर ती भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी आज ११ मे रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे ब्रह्मोस एकात्मिकीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते. ही कारवाई म्हणजे दहशतवादाविरोधातील भारताच्या कणखर इच्छाशक्तीचे तसेच, भारताच्या भूमीवर भारत विरोधी घटक तसेच दहशतवादी संघटनांमुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळेल याची सुनिश्चिती करणाऱ्या, सशस्त्र दलांची क्षमता आणि निर्धाराची प्रचिती देणारी कारवाई होती अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी या कारवाईचे वर्णन केले.

ऑपरेशन सिंदूरला हे, भारत जेव्हा जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई करतो, तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी सीमेपलीकडील भूमी देखील सुरक्षित ठिकाण नसते याचाच पुरावा असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. उरी इथल्या घटनेनंतरचा सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यानंतरचे हवाई हल्ले आणि आता पहलगाम हल्ल्यानंतरच्या अनेक हल्ल्यांमधून, भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ले झाल्यास भारत काय करू शकतो याचे दर्शन अवघ्या जगाला झाले असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा अवलंब करत, आजचा नवा भारत सीमेच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या दहशतवादाविरोधात प्रभावी कारवाई करेल ही बाब स्पष्ट केली आहे असे त्यांनी सांगितले.

ही कारवाई केवळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठीच राबवली गेली, या कारवाईत निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आले नव्हते ही बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. तरी देखील पाकिस्तानने मात्र भारतातील नागरी भागांना लक्ष्य केले आणि मंदिरे, गुरुद्वारा तसेच चर्चवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. आपल्या सशस्त्र दलांनी शौर्य आणि संयमाचे दर्शन घडवत पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले असे ते म्हणाले. आपण केवळ सीमेजवळच्याच लष्करी तळांवर कारवाई केली नाही, तर आपल्या सशस्त्र दलांचा धडाका पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत पोहोचला असे ते म्हणाले.

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राविषयी देखील माहिती दिली. हे केंद्र संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या भारताच्या प्रयत्नांना बळकटी देईल आणि मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करून या प्रदेशाच्या सामाजिक – आर्थिक विकासातही योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनीच होत असलेल हे उद्घाटन म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे, यातून भारताच्या वाढत्या नवोन्मेषी उर्जेचे प्रतिबिंब उमटले आहे तसेच ही घडमोड अतिमहत्त्वाच्या, अत्याधुनिक आणि आघाडीच्या तंत्रज्ञानात वेगाने होत असलेल्या जागतिक बदलांशी सुसंगत घडमोड असल्याचे ते म्हणाले.

ब्रह्मोस म्हणजे केवळ जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक नाही, तर ते भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा संदेश आहे, तो शत्रूंना रोखणारा संदेश आहे तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करण्याच्या अतूट वचनबद्धतेचा संदेश आहे असे ते म्हणाले. ब्रह्मोस म्हणजे भारत आणि रशियाच्या उच्च संरक्षण तंत्रज्ञानाचा मिलाफ असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ‘जोपर्यंत भारत जगासमोर उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला कोणतेही स्थान नाही, केवळ सामर्थ्यच सामर्थ्याचा आदर करते’ असे भारताचे क्षेपणास्त्र पुरुष अर्थात Missile Man आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले असल्याचा दाखला त्यांनी दिला. आणि आज भारत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक आहे आणि हे केंद्र भारताची ताकद आणखी वाढवण्यात मदतीचे ठरेल असे त्यांनी सांगितले.

हे सुविधा केंद्र उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर (UPDIC) साठी अभिमानाची बाब असल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले. या केंद्राच्या माध्यमातून या पूर्वीच सुमारे ५०० प्रत्यक्ष आणि १,००० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत, यातून संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून राज्याची वाढत्या स्थानाची प्रचिती येते असे ते म्हणाले. राज्याला (उत्तर प्रदेश) जगातील सर्वोच्च संरक्षण उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे, त्याला अनुसरूनच ध्येयावर आधारित आहे, या कॉरिडॉरची स्थापना करावी असा दृष्टीकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बाळगला ही बाबही राजनाथ सिंह यांनी ठळकपणे अधोरेखित केली.

उत्तर प्रदेश संरक्षण औद्यो

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech