नीरज चोप्राची प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल मानद पदावर नियुक्ती

0

नवी दिल्ली : भारतासाठी दोन ऑलिंपिक पदके जिंकणाऱ्या नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचे मानद पद देण्यात आले आहे.असे संरक्षण मंत्रालयाने बुधवारी (दि. १४) सांगण्यात आले आहे.ही नियुक्ती १६ एप्रिलपासून लागू झाली आहे, असे एका निवेदनात म्हंटले आहे. संरक्षण मंत्रालयाची नीरज चोप्रा यांना सन्मानित करण्याची घोषणा भारत सरकारच्या मासिक गॅझेट ऑफ इंडियामध्ये करण्यात आली होती. “९ मे २०२५ रोजीच्या क्रमांक ३ (ई) च्या आदेशानुसार, प्रादेशिक सेना नियमन, १९४८ च्या कलम ३१ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपतींनी माजी सूबेदार नीरज चोप्रा, पीव्हीएसएम, पद्मश्री, व्हीएसएम, खंड्रा गाव आणि पोस्ट ऑफिस, पानीपत, हरियाणा यांना १६ एप्रिल २०२५ पासून प्रादेशिक सेनेत लेफ्टनंट कर्नलचा मानद पदवी प्रदान करण्यास आनंद व्यक्त केला आहे,” असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

नीरज चोप्रा यांना २६ ऑगस्ट २०१६ रोजी भारतीय सैन्यात नायब सूबेदार पदावर ज्युनियर कमिशंड अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.आता त्याला प्रमोशन देण्यात आले आहे. त्यानंतर चोप्रा लेफ्टनंट कर्नल झाला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुष भालाफेकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर २२ महिन्यांनी त्यांना ४ राजपुताना रायफल्सने त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले.२०२२ मध्ये, माजी विश्वविजेत्याला पद्मश्री, हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देण्यात आला.

भालाफेकपटू शुक्रवारी (दि.१६) दोहा डायमंड लीगमध्ये आपला हंगाम सुरू करेल, त्यानंतर तो २३ मे रोजी पोलंडच्या चोर्झो येथे होणाऱ्या ७१ व्या जानुझ कुसोकिंस्की मेमोरियल, वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर (सिल्व्हर लेव्हल) मध्ये भाग घेईल. नीरज २४ जून रोजी चेक प्रजासत्ताकातील ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक २०२५ अथॅलेटिक्स स्पर्धेतही भाग घेणार आहे, गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये दुखापतींमुळे माघार घेतल्यानंतर तिसऱ्यांदा भाग्यवान होण्याची आशा आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech