सोलापूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपच्या खांद्यावर देण्यात आली आहे. रक्षक कंपनीचा ठेका रद्द करण्यात आल्यानंतर यापुढे बीव्हीजी ग्रुपकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दररोज हजारो भाविक मंदिरात येतात. त्यामुळे दर्शन बारीसह मंदिरातील दर्शन व्यवस्था सुरळीत करण्याबरोबरच इतर सुरक्षेसाठी मंदिर समितीने सुरक्षा रक्षक पुरविण्याची निविदा काढली होती. यामध्ये ५ कोटी ७७ लाख रुपयांचा ठेका बीव्हीजी ग्रुपला मिळाला आहे. १ जूनपासून मंदिराची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी बीव्हीजीकडे येणार आहे. यापूर्वी रक्षक कंपनीला सुरक्षेचा ठेका देण्यात आला होता.