मालगाडी रुळावरून घसरली, सुरत – भुसावळ रेल्वे वाहतूक स्थगित

0

जळगाव : अमळनेर येथे मोठा रेल्वे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. भुसावळकडून नंदुरबारकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना आज १५ मे रोजी प्रताप महाविद्यालयाजवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. डब्बे खाली पडल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. स्टेशन पासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्ती कामाला सुरुवात केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech