ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस आमदाराने उपस्थित केली शंका

0

बंगळूरू : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय लष्कराचे संपूर्ण देशासह जगभरातून स्वागत केलं जात आहे. मात्र, कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर शंका उपस्थित केली केली आहे.ऑपरेशन सिंदूर हे फक्त कारवाईचं ढोंग होतं, अद्याप पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळालेला नाही, असं वक्तव्य आमदार कोथुर मंजुनाथ यांनी केलं आहे.

ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार कोथुर मंजुनाथ म्हणाले, हे सर्व ढोंग होतं. काहीही झालेलं नाही. फक्त दिखाव्यासाठी तीन-चार विमानं पाठवून परत बोलावली. या कारवाईमुळे पहलगाममध्ये हत्या झालेल्या २६ लोकांना न्याय मिळेल का? ज्यांच्या घरातील लोक मारले गेले त्या महिलांचे दुःख कमी होईल का? त्याचा सन्मान करण्याचा हा मार्ग आहे का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी लष्कराच्या कारवाईवर शंका उपस्थित केली.

तसंच यावेळी आमदार मंजुनाथ यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारल्याच्या दाव्यावरही शंका व्यक्त केली. ते म्हणाले, “१०० दहशतवादी मारले गेले हे निश्चितपणे माहिती आहे का? त्यांची ओळख काय आहे? मारले गेलेले दहशतवादीच २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात हल्ला करणारे होते का? दहशतवादी आत घुसले तेव्हा सीमेवर सुरक्षा का नव्हती? ते पळून कसे गेले? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.शिवाय आपण दहशतवादाची पाळेमुळे शोधून त्याचा नायनाट केला पाहिजे. हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणेचे पूर्ण अपयश असल्याचंही आमदार मंजुनाथ म्हणाले. दरम्यान, आम्ही कर्नाटक, पाकिस्तान, चीन किंवा बांगलादेश कुठल्याही नागरिकांविरुद्धच्या युद्धाविरोधात आहोत, असंही ते यावेळी म्हणाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech