यशस्वी नगरचा वनवास संपला – आ. केळकर

0

ठाणे : आ. केळकर यांच्या हस्ते यशस्वी नगर येथील गृहसंकुलांना मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) वाटप करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नाने यशस्वी नगर येथील या गृहसंकुलाना मालमत्ता कार्ड मिळाले आहेत. येथील रहिवासी्यांनी आ. केळकर यांचे मनोभावे आभार व्यक्त करून केळकर साहेब केवळ तुमच्यामुळेच आम्हाला ७/१२ मिळाला व प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे, न्याय मिळाला आहे. आमच्या घरांवरील टांगती तलवार दूर झाली आहे. अशी भावना या रहिवासी्यांनी बोलताना व्यक्त केली. भाजपाचे निलेश पाटील यांनी याबाबत आ. केळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

या जनसंवाद कार्यक्रमात दादर येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आ. केळकर यांचा सत्कार केला. मुंबई च्या फुटपाथ वरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांवर कार्यवाई होते होती. आ. केळकर यांच्या मुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांना आता कोणताही त्रास होते नाही. यामुळे दादर वरून येउन त्यांनी केळकर यांचा सत्कार केला.

ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या खोपट कार्यालयात साकाळी १०.३० ते १ पर्यंत उपस्थित असतात. या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आ. केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात.

यावेळी विविध ४५ निवेदने आ. केळकर यांच्याकडे प्राप्त झाली. वर्तकनगर पोलीस स्टेशन अंतर्गत विषय, वर्तकनगर दोस्ती रेंटल मधील रहिवासी, महापालिका कर्मचारी पैसे घेऊन अनधिकृत गाड्या लावणे, कंत्राटी कामगार, सफाई कामगार विषय, बाधित होणारी दुकाने पुनर्वसन, पाणी विषय, विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, बदली विषय, वृक्षप्राधिकरण विषय, ठा म पा कर्मचारी विषय, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत विषय अशा विविध विषयांतील निवेदने आ. केळकर यांना देण्यात आली.

आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांच्या हस्ते दहावी मध्ये उत्तम टक्के ने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खोपट कार्यालयात आमदार निरंजन डावखरे, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुनेश जोशी, रमेश आंब्रे, सचिन पाटील, महेश कदम, निलेश कोळी, ओमकार चव्हाण, दत्ता घाडगे उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech