जम्मू-काश्मिरात एसआयएचे धाडसत्र

0

श्रीनगर : राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) आज, शनिवारी जम्मू-काश्मिरात अनेक ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा दलांची आणि महत्त्वाच्या आस्थापनांची संवेदनशील माहिती मेसेजिंग ॲप्सद्वारे शेअर केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे ‘एसआयए’ने म्‍हटले आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही अटक करण्‍यात आलेली नाही.

एसआयएने राज्यातील श्रीनगर, गंदरबल, बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांमध्ये कारवाई सुरू केली आहे. श्रीनगरमध्ये, नौगाम सारख्या भागात शोध घेतला जात आहे, तर बारामुल्लामध्ये, कुंजार परिसरात देखील सक्रिय छापे टाकले जात आहेत. यासंदर्भातील माहितीनुसार, एसआयएच्या तपासणीखाली असलेल्या दीर्घकाळ चाललेल्या दहशतवादाशी संबंधित प्रकरणांशी तपास जोडलेला आहे. आरोपींनी व्हॉट्सऍप, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे संवेदनशील सुरक्षा माहिती शेअर केली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech