चकमकीत सुरक्षा दलाचा जवानही हुतात्मा
नारायणपूर : छत्तीसगच्या नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांचे मोठे ऑपरेशन सुरू आहे. सैनिकांनी माओवाद्यांच्या एका मोठ्या पथकाला घेरले आहे. याठिकाणी सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत कोट्यवधींचे बक्षीस असलेला नक्षलवादी बसवा राजू याच्यासह सुमारे ३० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. तर सुरक्षा दलाच्या एका जवानाने हौतात्म्य पत्करले आहे. नक्षलवाद्यांचए नेते बसवा राजू याच्यावर कोट्यवदींचे बक्षीस होते. या चकमकीत इतर अनेक मोठे माओवादी नेतेही मारले गेले असून चकमक संपल्यानंतर मृतकांची संख्या आणखी वाढू शकते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी या कारवाईला दुजोरा देताना सांगितले की या चकमकीत एक सैनिक शहीद झाला आणि दुसरा सैनिक जखमी झाला.
अबुझमदच्या जाटलूर भागात ही चकमक सुरू आहे. या चकमकीबद्दल फक्त सुरुवातीची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांना यामध्ये मोठे यश मिळू शकते. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांच्या मते, नक्षलवाद्यांच्या माड विभागातील एका मोठ्या केडरच्या माहितीच्या आधारे, डीआरजी नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागावने अबुझमदमध्ये एक ऑपरेशन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील कर्रेगुट्टाच्या जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा दलांनी सर्वात मोठे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू केले होते.