वैष्णवी आत्महत्या प्रकरण : सासऱ्यांसह दिराला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

0

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार असलेले सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (दि.२३) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं.दुपारी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता कोर्टाने दोघांना २८ मे पर्यंत ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज(दि. २३) पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतल.त्यानंतर आज त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असून कोर्टाने या दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे. सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरु झाली असून, सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech