आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने दरात घसरण

0

जळगाव : गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी वाढ झाल्याने खरेदीदारांना झळ बसत आहे. अशातच आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने दरात घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी (२६ मे) सोन्याचे भाव प्रति तोळा ४४० रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याच्या किमतीसोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. सोने दरात झालेल्या घसरणीनंतर १ तोळा सोन्याचे दर ९७,६४० रुपये आहे. काल हेच दर ९८,०८० रुपये होते. या किंमती घसरल्या आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,११२ रुपये आहेत. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ८९,५०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६०० रुपये आहेत. या किंमतीत ३२० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी घट झाली आहे. आज १ तोळा सोने ७३,२३० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. चांदीचा भाव ९७,८७८ रुपये प्रति किलो आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech