मायक्रोसॉफ्टकडून पुन्हा ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात

0

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे सत्र सुरुच आहे. कंपनीने ३०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच कंपनीने ६,००० लोकांना कामावरून कमी केले होते. कंपनीने नेमके कोणते कर्मचारी किंवा विभाग यावेळी कमी केले, हे सांगितलेले नाही. पण मागील वेळेस सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांना जास्त फटका बसला होता. याहीवेळी ही अशाच पदांवर परिणाम झाल्याची शक्यता आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, ही कर्मचाऱ्यांची कपात चुकीच्या कामासाठी नाही, तर कंपनीची पुढील योजना लक्षात घेऊन केली आहे. कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर भर देत आहे. काही प्रकल्पांमध्ये ३०% कोड एआयद्वारे तयार होत असल्याचेही स्पष्ट केले आहे. यासाठी मायक्रोसॉफ्टने ८० अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे.

सध्या मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे २.२८ लाख कर्मचारी कार्यरत असून, कंपनीने नवीन कामगिरी मूल्यांकन प्रणाली आणि ऐच्छिक विभक्ती योजनेसह पुनर्रचना सुरू ठेवली आहे. तर कंपनीने नवीन नियमही लागू केले आहेत. जर कोणाची कामगिरीमुळे नोकरी गेली असेल, तर त्या व्यक्तीला दोन वर्षांनीच पुन्हा नोकरी मिळू शकते. तसेच काही लोकांना ऐच्छिक निवृत्तीवर १६ आठवड्यांचे वेतनही दिले जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech