जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने तेजीत

0

जळगाव : सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली. यामुळे सोन्याने एक लाखाची भरारी घेतली आहे. तर चांदीने पण मोठी उसळी घेतली आहे. यामुळे खरेदीचा प्लॅन आखणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या २४ तासात सोने दरात ८०० रुपयांची वाढ झाली. यामुळेसोने ९७ हजार ५०० रुपये (जीएसटीसह १००४२५) प्रति तोळा झाले आहे.दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. एक लाख ५०० रुपये प्रति किलोवर भाव गेले. जीएसटीसह चांदीचे भाव आता एक लाख तीन हजार ५१५ रुपयांवर पोहचले आहे.

खरंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप थांबलेलं नसून दोन्ही देशांमध्ये शांततेवर चर्चा सुरू असतानाच युक्रेननं रशियावर ड्रोन हल्ला चढवला. यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्या पुन्हा युद्ध भडकले. परिणामी सोने चांदी दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी जळगावात जीएसटीसह सोन्याचे दर हे ९५ हजार रुपये एवढे होते. मात्र पंधरा दिवसात सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. दुसरीकडे सोन्या चांदीचे दर एक लाखांवर पोहोचल्याने सराफ बाजारात ग्राहकांवर परिणाम झाला आहे. सोन्याने चांदी मध्ये होत असलेल्या सततच्या चढ उतारामुळे ग्राहक संभ्रमात असून सराफ बाजारात त्याचा मोठा परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाली असून शुकशुकाट पाहायला मिळत आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech