रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्यावर नाणे दरवाजाजवळ बंदोबस्त दोन गृह रक्षक होमगार्ड तैनात होते ते जखमी झाले. तर एक शिवभक्त बेधुंद नाचत असतांना बेशुद्ध पडण्याची घटना घडली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन असल्याने रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते. उपस्थित राहणाऱ्या शिवभक्तांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनासह लगत असणाऱ्या रत्नागिरी, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस प्रशासन तसेच गृह रक्षक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किल्ले रायगडावरील नाणे दरवाजा येथील पायरी मार्गावर दगडी कोसळल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तैनात असलेले गृह दलाचे होमगार्ड दोन रक्षक जखमी झाले, या दोन्ही जखमी होमगार्ड यांना तत्काळ पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करून अधिक उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित कदम आणि प्रणय मोरे अशी गृहरक्षक दलाचे जवानाची नवे असून राज्याभिषेक सोहळा सुरू असताना एक शिवभक्त बेधुंद होऊन नाचत असल्याने त्याला भुवड आल्याने त्याला देखील पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उच्चारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती महाड येथील तहसीलदार शितोळे यांनी दिली.