रोहा येथील शिवसृष्टीचे अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

0

रायगड : रोहा-अष्टमी नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या ‘शिवसृष्टी’ या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या शिवसृष्टीमध्ये स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून, त्यातून महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि धैर्याचे दर्शन घडते. “हे किल्ले केवळ स्थापत्य नव्हे, तर स्वाभिमान, स्वतंत्रता आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहेत,” असे प्रतिपादन तटकरे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, नगरपरिषद मुख्याधिकारी अजयकुमार एडके, तसेच संतोष पोटफोडे, मधुकर पाटील, समीर शेडगे, विनोद पाशीलकर, सुरेश मगर, महेश कोलटकर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसृष्टीच्या माध्यमातून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech