“चुकीची माहिती पसरवणे कायद्याचा अपमान”- निवडणूक आयोग

0

महाराष्ट्र निवडणुकीबाबत राहुल गांधींच्या आरोपांना दिले उत्तर

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा दावा केला आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर दिलेय. महाराष्ट्राच्या मतदार यादीवर लावण्यात आलेले आरोप निराधार असून चुकीची माहिती पसरवणे हा कायद्याचा अपमान असल्याचे आयोगाने म्हंटले आहे. राहुल गांधींनी निवडणुकीवर प्रभाव पाडण्याची ५ कारणे सांगितली आहेत. त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आणि लिहिले, निवडणूक कशी चोरायची ? २०२४ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकशाहीत गोंधळाची एक ब्लूप्रिंट होती. राहुल गांधींच्या आरोपाला दिलेल्या उत्तरात निवडणूक आयोग म्हणाले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीवर लावण्यात आलेले निराधार आरोप कायद्याच्या राज्याचा अपमान आहेत.

निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला पाठवलेल्या उत्तरात ही सर्व तथ्ये समोर आणली होती, जी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. असे मुद्दे वारंवार उपस्थित करताना या सर्व तथ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कोणीही चुकीची माहिती पसरवणे हे केवळ कायद्याचा अनादर करण्याचे लक्षण नाही तर स्वतःच्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींना बदनाम करते. तसेच निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचवते. मतदारांच्या कोणत्याही प्रतिकूल निकालानंतर, असे बोलून निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे असे आयोगाने म्हंटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech