गंभीर आजारावर मात करून अभिनेते विद्याधर जोशीचं रंगभूमीवर कमबॅक

0

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके अभिनेता बाप्पा जोशी अर्थात अभिनेते विद्याधर जोशी गंभीर आजारावर मात करुन तब्बल ३ वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहे. त्यांनी बिगबॉस मराठीचं दुसरं पर्वही चांगलंच गाजवलंय.त्यानंतर आता विद्याधर आजारावर मात करून तब्बल ३ वर्षांनंतर रंगभूमीवर कमबॅक करणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशींना फायब्रॉसिस हा गंभीर आजार झाला होता. या आजारामुळे विद्याधर यांना सतत दमा लागायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. यामुळे अभिनय क्षेत्रापासून ते काहीसे दूर होते. महिन्याभरात विद्याधर यांचा हा आजार वाढला आणि त्यांचं ६०% फुफ्फुस निकामी झालं. यामुळे त्यांना चालू मालिका सोडावी लागली. पुढे डॉक्टरांनी त्यांच्या फुफ्फुसांवर शस्त्रक्रिया करुन ऑपरेशन केलं. ऑपरेशननंतर काही दिवसांनी विद्याधर जोशींना बरं वाटलं.

आता विद्याधर जोशी पु,ल. देशपांडेंच्या गाजलेल्या ‘सुंदर मी होणार’ नाटकातून रंगभूमीवर कमबॅक करक आहे. इतक्या मोठ्या आजारपणानंतर रंगभूमीवर परतण्याची धाकधूक त्यांना आहे. परंतु रंगभूमीवर पुन्हा काम करण्यास ते उत्सुक आहेत, अशी भावना विद्याधर जोशींनी शेअर केली. विद्याधर यांनी काही महिन्यांपूर्वी ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक केलं. आता विद्याधर यांना रंगभूमीवर अभिनय करताना पाहण्यास, त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech