नृत्यांगना गौतमी पाटीलची ‘देवमाणूस’ मालिकेत होणार एन्ट्री

0

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेली ‘देवमाणूस’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या मालिकेचा मधला अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.त्यात आता देवमाणूसा मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये प्रसिद्ध लावण्यवती, नृत्यांगना गौतमी पाटीलची ‘देवमाणूस’ मालिकेत वर्णी लागली आहे. या मालिकेद्वारे गौतमीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

दरम्यान, श्वेता शिंदेच्या “देवमाणूस मधला अध्याय” या मालिकेत गौतमीला अभिनयाची संधी देण्यात आली आहे. डॉ अजितकुमार देवला तिच्या नखरेल अदांनी घायाळ करण्यासाठी गौतमी मालिकेत एन्ट्री घेत आहे. नुकताच सोशल मीडियावर देवमाणूस मालिकेचा आगामी प्रोमोची झलक दाखवण्यात आली आहे. “सबसे कातिल’ गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार?”, असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये गौतमीचा पाटील पाहायला मिळते. आपल्या नृत्य आणि अदाकारिने भल्याभल्यांना घायाळ करणारी गौतमी आता अभिनयच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

दरम्यान, यापूर्वी गौतमीने व्हिडीओ अल्बम ‘घुंगरू’ तसेच काही चित्रपट आणि स्टार प्रवाहच्या रिऍलिटी शो होऊ दे धिंगाणामध्ये हजेरी लावली होती. आता शिट्टी वाजली रे या कुकिंग रिएलिटी शोमधून गौतमी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर तिला अभिनय करताना चाहते सुद्धा उत्सुक झाले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech