त्रंबकेश्वर : आषाढ यात्रेसाठी आज मंगळवार दि.१० जून रोजी दुपारी २ वाजता त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या वारीत सुमारे ४० हजार वारकरी सहभागी होणार असल्याचे संयोजकांच्या वतीन सांगण्यात आले आहे. संत निवृत्तिनाथांच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी नाशिक तसेच मराठवाड्यातील वारकरी, भाविक येथे जमले आहेत. पालखीच्या आरंभी सुरुवातीला आठ ते दहा हजार वारकरी या दिंडीत असतील पुढे नाशिक जिल्ह्यात सिन्नर येथे चारकऱ्यांची संख्या वाढणार आहे. नंतर नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून येणारे दिंडीत सामील होणारे वारकरी मिळून सुमारे ४० हजार वारकरी पंढरपूरकडे पायी जाणार आहे.
संत निवृत्तिनाथांच्या दिंडीत पंढरपुरात पालखी सोबत मानाच्या ४५ दिंड्या, तसेच २५ लहान मोठ्या दिंड्या आणि सहभागी होणार आहेत. विशेष यंदाही महिला वारकरी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असणार आहे. वारीसाठी संत निवृत्तिनाथ महाराज समाधीमंदिर ट्रस्टकडून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे वारीसाठी चांदीचा रथ स्वच्छता करून झळाळी देण्यात आली आहे रथात संत निवृत्तिनाथांच्या पालखीत प्रतिमा, पादुका ठेवल्या जाणार आहे. मानाची बैलजोडी हा रथ ओढणार आहे.पालखी मार्गातील ५५ ग्रामपंचायतीला वन विभागाचे माध्यमातून रोपे देण्यात येणार आहेत. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून तीन लाख रुपये निधी देण्यात आला होता, यावर्षी असे नियोजन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. पालखी मार्ग अहिल्यानगर जिल्हा सोलापूर जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेला पालखी स्वागत,
नियोजनाची सूचना देण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वरवरून दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान होईल. पालखीचा पहिला मुक्काम संत निवृत्तिनाथांचे गुरु गहिनीनाथ यांचे समाधी स्थळी म्हणजे श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा येथे होईल. पालखीसोबत स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचा टॅन्कर, वैद्यकीय पथक मोबाईल टॉयलेट असणार आहे. तसेच पालखी मार्गात रथमार्गात रस्त्यांची दुरुस्तीची सूचना देण्यात आलेली आहे.