निवडणूक आयोग राजकीय पक्षांना देणार मतदार याद्यांचा डेटा

0

नवी दिल्ली : निवडणूक आयोग राजकीय पक्षांना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या शेअर करणार आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून राहुल गांधींनी यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) संदेश जारी केलाय. याबाबत राहुल गांधी म्हणाले की, मतदार यादी सोपवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा एक चांगला पहिला टप्पा आहे. हा डेटा डिजिटल आणि मशीन-रीडेबल फॉरमॅटमध्ये (जसे की एक्सेल किंवा सीएसव्ही) कोणत्या तारखेपर्यंत उपलब्ध होईल हे आयोग स्पष्ट करू शकेल का ? त्यांनी या पोस्टसोबत एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार 2009 ते 2024 पर्यंत हरियाणा आणि महाराष्ट्राची मतदार यादी शेअर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

विरोधी पक्ष बऱ्याच काळापासून अशी मागणी करत आहेत की मतदार यादी केवळ स्कॅन किंवा पीडीएफ स्वरूपातच नाही तर अशा डेटा स्वरूपात (जसे की एक्सेल, सीएसव्ही इ.) उपलब्ध करून दिली पाहिजे ज्यामुळे तिचे विश्लेषण करणे, अनियमितता ओळखणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे शक्य होईल. काँग्रेसने यापूर्वीही निवडणूक आयोगावर निवडणूक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. अलिकडेच राहुल यांनी महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या आरोपांवर एक लेख प्रकाशित केला होता, जो निवडणूक आयोगाने पूर्णपणे नाकारला होता. त्यानंतर, राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या ‘सूत्रांचा हवाला देऊन खंडन’ करण्याच्या वृत्तावरही टीका केली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech