सुकमा जिल्ह्यातील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

0

सुकमा : सुकमा जिल्ह्यातील कुकनार परिसरातील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये आज, बुधवारी चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून एक स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे. ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

प्रतिबंधीत सीपीआय माओवादी संघटनेच्या नक्षलवाद्यांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कुकानार पोलिस ठाणे कर्मचारी आणि सुकमा डीआरजी यांचे संयुक्त पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले. ही शोध मोहीम दुपारी २ वाजता सुरू झाली, त्यादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये अनेक वेळा गोळीबार झाला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमधील एकाची ओळख पटली आहे. तो पेद्रास येथील स्थानिक संघटनेचा कमांडर आहे. त्याच्यावर ५ लाखांचे बक्षीस होते. महिला नक्षलवाद्याची ओळख अजूनही पटलेली नाही. या चकमकीनंतर सुरक्षा दलांना हत्यारे सापडली आहे. यामध्ये एक इन्सास रायफल, एक १२ बोर रायफल, तसेच इतर शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. अतिरिक्त सहाय्यक पथके तैनात करण्यात आली आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech