अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सुन्न आणि व्यथित करणारी असून देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या दु:खद घटनेमुळे अनेकांचे मन हेलावून गेले आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या सहवेदना सर्व पीडितांसोबत आहेत,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या अपघाताने सर्वांची मनं हेलावून टाकली असून अनेकांचे जीवन उदध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्ट द्वारे दुःख व्यक्त केले आहे.

तसेच, या घटनेनंतर मदत व बचावकार्य तत्काळ सुरू करण्यात आले असून मंत्री व प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहून पीडितांना आवश्यक ती मदत पोहोचवली जात आहे, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. दरम्यान, दुर्घटनेत मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून स्थानिक यंत्रणा व केंद्र सरकार संयुक्तपणे काम करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech