तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. एकीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे, तर दुसरीकडे इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ले सुरू केल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील वृत्तानुसार, इस्रायली सैनिकांनी पुन्हा एकदा इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलने शिराज आणि तबरीज शहरांबरोबरच नतांज अण्वस्त्र ठिकाणांवर पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. तत्पूर्वी, “इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या मुख्य अण्वस्त्र ठिकानांचे मोठे नुकसान झाले आहे. ही मोहीम आणखी लांबू शकते,” असे इस्रायली सैन्य प्रवक्ता ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी सांगितले. याचा अर्थ, इस्रायल इराणवर आणखी हल्ले करणार हे स्पष्ट आहे. इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमचे आणि अण्वस्त्र ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे. याच बरोबर, या हल्ल्यात इराणचे लष्कर प्रमुख मोहम्मद बाघेरी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोरचे कमांडर हुसैन सलामी मारले गेले आहेत. असेही इराणने म्हटले आहे. याशिवाय, माहितीनुसार, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी देशाला संबोधित करताना, “इराणची प्रतिक्रिया एवढी भयंकर असेल की, इस्रायल पश्चाताप करेल, असे त्यांनी म्हटलं आहे.
इस्रायलचा इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर पुन्हा एकदा हल्ला
0दरम्यान, ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये इराण इशारा देताना म्हटले की, “मी इराणला अणु करार करण्यासाठी अनेक संधी दिल्या आहेत. त्यांना कडक शब्दात करार करण्यास सांगितले, पण त्यांनी अद्याप मान्य केले नाही. काही इराणी कट्टरपंथी या कराराला विरोध करत होते, पण ते सर्व आता मारले गेले आहेत. इस्रायलकडे अनेक घातक शस्त्रे आहेत, पुढे जे घडेल, ते आणखी वाईट असेल. आधीच खूप मृत्यू आणि विनाश झाला आहे, पण हा नरसंहार संपवण्यासाठी अजूनही वेळ आहे असे ट्रम्प म्हणालेत.