विमान अपघाताचा व्हिडिओ शूट करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

0

अहमदाबाद : अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा व्हिडिओ शूट करणा-या आर्यन आसरी (वय – १७) याला प्राथमिक चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवण्यासाठी आर्यनने एअर इंडिया विमानाचा व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओमध्ये एअर इंडिया विमान हवेत संघर्ष करताना आणि शेवटी कोसळताना दिसत होते. हा धक्कादायक व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. जगभरातील विमान अपघात तज्ज्ञांपासून ते स्थानिक पोलिसांपर्यंत अनेकांनी या व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण केले. शनिवारी पोलिसांनी त्याला व्हिडिओबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ताब्यात घेतले.

कोण आहे आर्यन – आर्यन हा अरावली जिल्ह्यातील गावात राहत असून तो इयत्ता बारावीत शिकत आहे. तो अहमदाबादच्या लक्ष्मीनगर भागातील तीन मजली इमारतीच्या गच्चीवर उभा होता. हा परिसर विमानतळाच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळे आकाशातून जाणारी विमाने अगदी हात पोहोचण्याच्या अंतरावरून जात असल्याचे दृश्य पाहून आर्यन भारावून गेला होता. त्यामुळे त्याने हा व्हिडीओ काढला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech