आधारकार्ड निःशुल्क अपडेट करण्यास मुदतवाढ

0

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ पर्यंत होती. आता ती १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यूआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर (एक्स) हॅन्डलवर याबाबत माहिती दिली आहे.

या निर्णयामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे. विशेषतः ज्या व्यक्तींचे आधार कार्ड १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी हे अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की अशा व्यक्तींनी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करून आपले आधार तपशील अद्ययावत करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास त्यांचे आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांना दोन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल – एक ओळखीचा पुरावा (उदा. पॅन कार्ड) आणि दुसरा पत्त्याचा पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र). साधारणपणे आधार केंद्रांवर या प्रक्रियेसाठी ५०रुपये शुल्क आकारले जाते. तथापि, यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ पर्यंत ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech