बियाणे आणि खते शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे – भुजबळ

0

येवला : शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावे. अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत विविध विकासकामांबाबत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते अधिकाऱ्यांशी बोलत होते‌ यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड,निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला शहर पोलिस निरीक्षक धीरज महाजन, तालुका पोलिस निरीक्षक मंडलिक सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहर व तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेला कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावे. वीजपडून तसेच अतिवृष्टीमुळे जीवित हानी व वित्त हानी झालेली असेल त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ते पुढे म्हणाले की, तालुक्यात शासनाकडून २५० क्विंटल मोफत बियाणाचे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाणाचे लाभार्थ्यांना योग्य रित्या वाटप करण्यात यावे. शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी आवश्यक तितका स्टॉक करून ठेवण्यात यावा तसेच त्यानुसार शासनाकडे मागणी करण्यात यावी. शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा मूलबक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे अशा सूचना केल्या. तालुक्यात काही भागात अद्यापही पाणी टंचाई असून याभागातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. या परिसरात १ जुलै नंतर देखील टँकरची आवश्यकता लागल्यास तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावा. येवला शहरातील साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech