नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने हरवून जेतेपद पटकावले. यानंतर माजी क्रिकेटपटू डेल स्टेनने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेबद्दल एक भाकीत केले आहे. ही मालिका कोणता संघ जिंकेल त्याबाबत स्टेनने ही भविष्यवाणी केली आहे. पाचही सामन्यांचे निकाल समोर येतील आणि भारतीय संघ या कसोटी मालिकेत संघर्ष करताना दिसेल. असं मत डेल स्टेनने व्यक्त केले आहे.
“पाचही सामने जवळचे असतील, एकही अनिर्णीत राहणार नाही. मला वाटते की इंग्लंड ही मालिका ३-२ ने जिंकेल.” असं भाकीतत डेल स्टेनने वर्तवले आहे. दरम्यान,त्याने असेही म्हटले की, दोन्ही संघ कोणताही सामना सहज जिंकणार नाही. भारतीय क्रिकेट संघाने गेल्या १८ वर्षांपासून इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. २००७ मध्ये, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर, संघाने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकूण ४ वेळा इंग्लंडचा दौरा केला होता. मात्र, यापैकी ३ मालिका त्यांना गमवाव्या लागल्या आणि १ अनिर्णित राखण्यात यश आलं आहे.