जळगाव : जळगावच्या सुवर्णबाजारात सोने दराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याचा तोळा विना जीएसटी एक लाखावर पोहोचला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोने दरात ४०० रुपयांची वाढ झाली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर एक लाख रुपयावर पोहोचले. तर जीएसटीसह सोन्याचा तोळा एक लाख तीन हजार रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे दोन दिवसापासून कमी होत असलेल्या चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख सात हजार ५०० रुपयांवर पोहोचली.
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सोने दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी सोने दरात हजार रुपयांची तर शुक्रवारी ८०० रुपयांची वाढ झाली. त्यात ४०० रुपयांची भर पडून सोने लाखावर पोहोचले आहे. दरम्यान इस्रायल-इराण युद्धामुळे आगामी काळात क्रूड ऑइलच्या पुरवठ्यात अडचणी होतील. गेल्या काही दिवसांत त्याचा परिणाम शेअर बाजारासह सोन्या-चांदीच्या दरावरही झाला.